वेस्ट इंडिज विरुद्धच्या शतकानंतर विराट कोहलीच्या नावावर 8 विक्रमांची नोंद, काय ते वाचा

| Updated on: Jul 22, 2023 | 5:36 PM

रनमशिन विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. एका शतकासह त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

1 / 9
वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 206 चेंडूत 11 चौकारांसह 121 धावा केल्या. या शतकासह त्याने आठ विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली आहे.

2 / 9
वेस्ट इंडिजविरुद्धच्या शतकासह किंग कोहली 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

3 / 9
विराट कोहली 500 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे. याआधी 75 शतके झळकावणारा सचिन तेंडुलकर अव्वल स्थानावर होता. किंग कोहली आता 76 शतकांसह अव्वल स्थानावर आहे.

4 / 9
विराट कोहली सर्वात जलद 76 शतके करणारा फलंदाज ठरला. विराटने अवघ्या 500 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे.

5 / 9
सध्याच्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. या यादीत कोहली 76 शतकांसह अव्वल, तर जो रूट 46 शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

6 / 9
विराट कोहली 500 सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा महान फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग (25035) याच्या नावावर होता. किंग कोहली एकूण 25461 धावांसह अव्वल स्थानावर आहे.

7 / 9
किंग कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 29 वे शतक झळकावून सर्वाधिक कसोटी शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दिग्गज डॉन ब्रॅडमन यांच्या 29 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

8 / 9
किंग कोहली वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. सुनील गावसकर (13) शतकांसह या यादीत अव्वल आहे. आता कोहली 12 शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

9 / 9
शतकासह कोहली जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2035 धावा करणारा रोहित शर्मा या यादीत अव्वल स्थानावर होता. विराट कोहली आता एकूण 2063 धावांसह पहिल्या स्थानावर आहे.