वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक बदलणार! राहुल द्रविडच्या जागी या दिग्गज क्रिकेटपटूला मिळू शकते संधी
Rahul Dravid : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळाला आहे. तर सहावा सामना गतविजेत्या इंग्लंड संघाशी होणार आहे. दुसरीकडे, राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून साथ या वर्ल्डकपपर्यंतच आहे.
1 / 7
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने पाच पैकी पाच सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित झालं आहे. असं असताना क्रीडाप्रेमींना धक्का देणारी बातमी समोर आली आहे.
2 / 7
वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर राहुल द्रविड आपल्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. राहुल द्रविड याचा प्रशिक्षकपदाच करार नोव्हेंबरमध्ये संपत आहे. त्यामुळे राहुल द्रविडचे भवितव्य वर्ल्डकपवर अवलंबून आहे असंच म्हणावं लागेल.
3 / 7
राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियाला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. गेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. तर टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे वर्ल्डकप जिंकण्यात अपयश आलं तर पायउतार व्हावं लागेल.
4 / 7
बीसीसीआयने टीम इंडियाला प्रशिक्षकपदाची पुन्हा ऑफर दिली तर ती द्रविड नाकारू शकतो. त्यामुळे बीसीसीआयाला दुसऱ्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. दुसरीकडे, द्रविड आयपीएल संघाचं प्रशिक्षकपद घेऊ शकतो.
5 / 7
प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ वाढवण्याबाबत राहुल द्रविड याच्याशी सध्यातरी काहीच चर्चा झालेली नाही. त्यामुळे वर्ल्डकपच्या निकालावर सर्वकाही अवलंबून आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इनसाईड स्पोर्ट्सला सांगितलं की " प्रशिक्षकपद सोडणार असं काही त्यांनी अजून काही सांगितलेलं नाही."
6 / 7
राहुल द्रविड याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियाने हवी तशी कामगिरी करता आली नाही. मालिकांमध्ये संघाने चांगली कामगिरी केली. आशिया चषकावरही नाव कोरलं. पण आयसीसी चषकांचा दुष्काळ काही संपला नाही.
7 / 7
राहुल द्रविड याचा मुख्य प्रशिक्षकपदाचा दोन वर्षांचा करार नोव्हेंबरमध्ये संपत आहे. यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मण किंवा आशिष नेहरा यांना मुख्य प्रशिक्षकाची संधी मिळू शकते, अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.