आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी रिंकु सिंहने सांगितली ‘मन की बात’, जे काही मिळते त्यात खूश
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे.त्यामुळे संघ कोणत्या खेळाडूंना रिटेन करणार यासाठी खलबतं सुरु आहेत. असं असताना कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या रिंकु सिंहने मनातलं सांगितलं आहे.
1 / 5
दुलीप ट्रॉफी स्पर्धेत रिंकु सिंहला संधी मिळालेली नाही. पण युपी टी20 स्पर्धेत रिंकु सिंह खेळत आहे. मेरठ मॅवरिक संघाचं कर्णधारपद त्याच्याकडे आहे. पण सर्वांचं लक्ष लागून आहे की रिंकु सिंह पुढच्या पर्वात कोणत्या संघाकडून खेळणार? याबाबत रिंकु सिंहने आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे.
2 / 5
रिंकु सिंह सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघासोबत आहे. मागच्या पर्वात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात संघाने जेतेपद मिळवलं होतं. त्याचबरोबर गौतम गंभीर मेंटॉर होता. मात्र आता सर्वच चित्र बदललं आहे. आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. तत्पूर्वी रिंकु सिंहने मनातलं सांगितलं आहे.
3 / 5
रिंकु सिंहने सांगितलं की, आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून 55 लाख रुपये मिळतात. या पैशात खूश असल्याचं त्याने सांगितलं. रिंकु सिंहने एकप्रकारे कोट्यवधी रुपयांपेक्षा संघ महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. रिंकु सिंह कोलकात्याचा महत्त्वाचा खेळाडू आहे.
4 / 5
रिंकु सिंहला कोलकाता नाईट रायडर्स संघ रिटेन करणार हे यात काही शंका नाही. त्यामुळे आयपीएल 2025 स्पर्धेत त्याची किंमत वाढणार हे निश्चित आहे. रिंकु सिंहने आयपीएलमध्ये कोलकात्यासाठी 46 सामने खेळले आहेत आणि 30 हून अधिक सरासरीने 893 धावा केल्या आहेत.
5 / 5
रिंकु सिंह आयपीएल 2023 स्पर्धेत चर्चेत आला होता. शेवटच्या पाच षटकार मारून संघाला विजयी केलं होतं. यश दयालला पाच षटकार ठोकत सामना फिरवला होता. तेव्हापासून रिंकु सिंह चर्चेत आहे. त्यानंतर टीम इंडियात खेळण्याची संधीही मिळाली.