वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने दिग्गज इंग्लंड संघाला पराभूत केलं. अफगाणिस्तानने 49.5 षटकात सर्व गडी गमवून 284 धावा केल्या. तसेच विजयासाठी 285 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण इंग्लंडचा संघ सर्वबाद 215 धावा करू शकला.
अफगाणिस्तानच्या विजयात भारताचा माजी खेळाडू अजय जडेजा याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. पडद्यामागून त्याने अफगाणिस्तानला रणिनिती आखून दिली होती. त्याची अंमलबजावणी करत अफगाणिस्तानने विजय मिळवला आहे.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी 52 वर्षीय अजय जडेजा याची अफगाणिस्तान संघाच्या मेंटरपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या उपस्थितीत अफगाणिस्तानचं नशीब फळफळलं.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानला आठ वर्षानंतर विजय मिळाला आहे. अजय जडेजा याने 13 वनडे सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. तर एकूण 196 सामने खेळले असून त्यात 3 वर्ल्डकपचा समावेश आहे.
अजय जडेजाच्या नावावर 6 शतक आणि 30 अर्धशतकांची नोंद आहे. त्याने 37.47 च्या सरासरीने 5359 धावा केल्या आहेत. 15 कसोटीत 576 धावा केल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये मीडियम पेस बॉलिंग करत त्याने 20 गडीही बाद केले आहेत. त्याच्या या अनुभवाचा अफगाणिस्तानला फायदा झाला. अफगाणिस्तानने साखळी फेरीत दोन सामने गमावले आहेत.