वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियावर तिसऱ्या आणि अंतिम टी 20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर 37 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाला 221 धावांचा पाठलाग करताना 183 धावाच करता आल्या.
आंद्रे रसेल-शेरफेन रुदरफोर्ड हे दोघे विंडिजच्या विजयाचे शिल्पकार ठरले. या दोघांनी पहिल्या डावात टीम अडचणीत असताना निर्णायक क्षणी अर्धशतकी खेळीसह शतकी भागीदारी केली.
आंद्रे रसेल-शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनी टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 139 धावांची भागीदारी केली. टी 20 क्रिकेटमध्ये सहाव्या विकेटसाठी ही सर्वाधिक धावांची भागीदारी ठरली.
आंद्रे रसेल याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकूण 71 धावांची खेळी केली. रसेलने या खेळीत 4 चौकार आणि 7 षटकार लगावले.
तर शेरफेन रुदरफोर्ड याने नाबाद 67 धावांची खेळी केली. रुदरफोर्ड याने या खेळीत 5 चौकार आणि 5 षटकार लगावले.