बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगच्या नावावर एक आणखी विक्रम, ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजाशी बरोबरी

| Updated on: Oct 06, 2024 | 9:54 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात अर्शदीप सिंगने मैलाचा दगड गाठला आहे. दोन विकेट घेताच ऑस्ट्रेलियन गोलंदाजासोबत बरोबरी साधली आहे.

1 / 5
भारत आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताची पकड दिसली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशची पिसं काढली. या सामन्यात अर्शदीप सिंग आणि वरुण चक्रवर्थीने जबरदस्त गोलंदाजी केली. दोघांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.

2 / 5
या सामन्यात अर्शदीप सिंगने एक विक्रम नोंदवला आहे. पॉवर प्लेमध्ये दोन विकेट घेत दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. इतकंच काय तर ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडची बरोबरी साधली आहे.

3 / 5
अर्शदीप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून भेदक गोलंदाजीचं दर्शन घडवलं आहे. भारताकडून सुरुवातीच्या षटकात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान त्याला मिळाला आहे.

4 / 5
पॉवर प्लेमध्ये अर्शदीप सिंगने 9 वेळा दोन किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडच्या टीम साउदीने 13 वेळा, अफगाणिस्ताच्या नवीन उल हकने 11 वेळा, तर अर्शदीप सिंग आणि ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने ही कामगिरी नऊ वेळा केली आहे.

5 / 5
अर्शदीप सिंगने 7 जुलै 2022 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. अर्शदीपने पॉवरप्लेच्या सहा षटकात आतापर्यंत एकूण 32 विकेट घेतल्या आहेत. (सर्व फोटो- बीसीसीआय)