अर्शदीप सिंग दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात रचणार हा विक्रम!

| Updated on: Nov 11, 2024 | 9:53 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात टी20 मालिका सुरु असून 1-1 ने बरोबरी झाली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवूनच मालिका विजय शक्य आहे. असं असताना अर्शदीप सिंग एका विक्रमाच्या वेशीवर आहे.

1 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना 11 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यात अर्शदीप सिंगला एक विक्रम रचण्याची संधी आहे.

2 / 5
अर्शदीप सिंगने 7 जुलै 2022 रोजी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत अर्शदीप सिंग 58 टी20 सामने खेळला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा तिसरा सामना 59वा असणार आहे.

3 / 5
अर्शदीपने 58 टी20 सामन्यात 1198 चेंडूत टाकले असून 1663 धावा दिल्या आहेत. तसेच 89 विकेट घेतल्या आहेत. 9 धावा देत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

4 / 5
अर्शदीप सिंगने 2022 साली भारतासाठी पदार्पण केले. त्याने 2022 मध्ये 33, 2023 मध्ये 26 आणि 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 30 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
अर्शदीप सिंगने आणखी 8 विकेट घेतल्यास तो भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलला मागे टाकून अव्वल स्थानावर पोहोचेल. चहलने टीम इंडियासाठी 96 विकेट घेतल्या आहेत. अर्शदीपने तिसऱ्या टी20 दोन विकेट घेतल्यास दुसऱ्या स्थानावर पोहोचेल. 90 विकेटसह भुवनेश्वर कुमार दुसऱ्या स्थानावर आहे.