Ashes 2023 : इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत उस्मान ख्वाजाने केली पाच दिवस फलंदाजी, कसं ते वाचा

| Updated on: Jun 21, 2023 | 5:36 PM

अॅशेस मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने 2 गडी आणि 27 चेंडू राखून जिंकला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे.

1 / 7
अॅशेस 2023 स्पर्धेतील पहिल्या कसोटीत उस्मान ख्वाजा पाच दिवस खेळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खरंच असं शक्य आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजाने हे करून दाखवलं आहे.

2 / 7
बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 8 गड्यांच्या मोबदल्यात 393 धावा करत डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा या जोडीने सुरुवात केली.

3 / 7
पहिल्या दिवशी सलामीला आलेल्या उस्मान ख्वाजाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत फलंदाजी केली. तिसऱ्या दिवशी त्याने 141 धावा केल्या आणि बाद झाला.

4 / 7
तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंड संघाने दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि चौथ्या दिवशी सर्वबाद 273 धावा केल्या. चौथ्या दिवशी पुन्हा एकदा उस्मान ख्वाजा आणि डेविड वॉर्नर सलामीला आले.

5 / 7
उस्मान ख्वाजाने पाचव्या दिवशीही फलंदाजी केली आणि 65 धावा करून तो बाद झाला. उस्मान ख्वाजा पाच दिवसीय कसोटी क्रिकेटमध्ये पाच दिवस फलंदाजी करणारा जगातील 13वा खेळाडू ठरला आहे.

6 / 7
पहिल्या डावात उस्मान ख्वाजाने 321 चेंडूत 141 धावांची खेळी केला. यात 14 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश आहे. दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजाने 197 चेंडूत 65 धावांची खेळी केली. यात 7 चौकारांचा समावेश आहे. उस्मान ख्वाजाने इंग्लंडविरुद्ध पाच दिवस खेळत एकूण 518 चेंडूचा सामना केला आणि 206 धावा करून एक विक्रम रचला आहे.

7 / 7
मोटगनल्ली जैसिन्हा (भारत), जेफ्री बॉयकॉट (इंग्लंड), किम ह्युजेस (ऑस्ट्रेलिया), अॅलन लॅम्ब (इंग्लंड), रवी शास्त्री (भारत), एड्रियन ग्रिफिथ (वेस्ट इंडिज), अँड्र्यू फ्लिंटॉफ (इंग्लंड), अल्विरो पीटरसन (दक्षिण आफ्रिका) , चेतेश्वर पुजारा (भारत), रॉरी बर्न्स (इंग्लंड), क्रेग ब्रॅथवेट (वेस्ट इंडिज), तेजनारायण चंद्रपाल (वेस्ट इंडीज) यांनी ही कामगिरी केली होती.