Harbhajan Singh | हरभजन सिंह याच्याशी पंगा महागात, भज्जीने शोएब अख्तर याची अशी जिरवली

| Updated on: Aug 28, 2023 | 10:43 PM

Harbhajan Singh Shoaib Akhtar | शोएब अख्तर याने हरभजन सिंह याला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर हरभजन सिंह याने जे केलं ते शोएब अख्तर कधीच विसरणार नाही.

1 / 6
आशिया कपमधील एका सामन्यात टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह आणि पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांच्यात चांगलाच वाद पेटला होता. तेव्हा हरभजनने अख्तरला बॅटने चोख उत्तर देत खणखणीत सिक्स ठोकला होता.

2 / 6
आशिया कप स्पर्धा 2023 ची सुरुवात 30 ऑगस्टपासून होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना हा पाकिस्तान विरुद्ध 2 सप्टेंबरला होणार आहे.  आतापर्यंत या दोन्ही कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये अनेक सामने झालेत आणि अनेकदा वादही झालेत. असंच काही 2010 मध्ये झालं.

3 / 6
आशिया कप 2010 स्पर्धेतील चौथ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने होते. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं 268 धावांचं लक्ष्य हे 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. हरभजनने 2 सिक्स ठोकत 15 धावांची निर्णायक आणि विजयी खेळी साकारली.

4 / 6
हरभजनला बॅटिंग दरम्यान शोएब अख्तर याने डिवचलं. यावरुन दोघेही आपसात भिडले. त्यानंतर भज्जीने अख्तरला बॅटने उत्तर दिलं. भज्जीने 47 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर अख्तरला सिक्स ठोकला. त्यानंतर अख्तरच्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये रैनाने सिक्स ठोकला.

5 / 6
टीम इंडियाने 49.5 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 271 धावा केल्या. हरभजनने 11 बॉलमध्ये 2 सिक्सच्या मदतीने 15 धावा केल्या. तर रैनाने 27 बॉलमध्ये 34 रन्स केल्या. रैनाने या दरम्यान 2 चौकार आणि 2 सिक्स खेचले.

6 / 6
टीम इंडियाने 2010 चा आशिया कप जिंकला होता. टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर 81 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने लंकेला  268 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र  श्रीलंकेला 187 धावाच करता आल्या.