IND vs PAK | पाकिस्तानचे हे 3 खेळाडू टीम इंडियासाठी डोकेदुखी, आशिया कपमध्ये गेम चेंजर ठरणार!
India vs Pakistan Asia Cup 2023 | टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 3 सप्टेंबर आशिया कप 2023 स्पर्धेत कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानचे 3 खेळाडू टीम इंडियाच्या विजयाची वाट अडवू शकतात.
1 / 5
पाकिस्तान क्रिकेट टीम बाबर आझम याच्या नेतृत्वात आशिया कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तान आशिया कपमधील पहिलाच सामना हा नेपाळ विरुद्ध खेळणार आहे.
2 / 5
त्यानंतर पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया 3 सप्टेंबरला महामुकाबला होणार आहे. या सामन्यात टीम इंडियासाठी पाकिस्तानचे 3 खेळाडू डोकेदुखी ठरु शकतात. कॅप्टन बाबर आझम, इमाम उल हक आणि शाहीन अफ्रीदी हे त्रिकुट टीम इंडियाचा गेम करु शकतात.
3 / 5
इमाम उल हक शानदार कामगिरी करतोय. इमामने अफगाणिस्तान विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या मालिकेतील एका सामन्यात 91 धावांची खेळी केली. इमामने सलग 2 अर्धशतकं ठोकली. त्यामुळे इमाम टीम इंडियासाठी डोईजड ठरु शकतो.
4 / 5
पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम हा टीम इंडियाच्या डोक्याला शॉट आहे. बाबरने आतापर्यंत 103 वनडेत 18 शतकं आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने 5 हजार 202 धावा केल्या आहेत. बाबरचा 158 हा वनडे क्रिकेटमध्ये हायस्कोअर आहे.
5 / 5
शाहीन अफ्रिदी हा पाकिस्तानचा हुकमाचा एक्का आहे. शाहिन अफ्रीदी याने आपल्या धारधार बॉलिंगने आतापर्यंत 39 वनडेत 76 विकेट्स घेतल्या आहेत. शाहीनच्या बॉलिंगचा सामना करणं आव्हानात्मक आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांसमोर शाहीनचा कसा सामना करतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.