IND vs NEP : नेपाळ विरुद्धच्या सामन्यात जवागल श्रीनाथ याच्या शिरपेचात मानाचा तुरा, नेमकं काय केलं ते वाचा
आशिया कप 2023 स्पर्धेत भारत विरुद्ध नेपाळ यांच्यात सामना रंगणार आहे. या सामन्यात माजी वेगवान गोलंदाज आणि मॅच रेफरीची भूमिका बजावणाऱ्या जवागल श्रीनाथ याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
1 / 7
भारताचा माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ नेपाळ विरुद्धच्या सामन्यात एका विक्रमाची नोंद करणार आहे. सामनाधिकारी म्हणून 250 व्या सामन्यात आपली भूमिका बजावणार आहे. श्रीनाथ मदुगले, ख्रिस ब्रॉड आणि जेफ क्रो याच्यानंतर अशी कामगिरी करणारा चौथा आयसीसी सामनाधिकारी असेल.
2 / 7
जवागल श्रीनाथ याने 2023 मध्ये क्रिकेट विश्वाला रामराम ठोकला. त्यानंतर आयसीसीकडून सामनाधिकाऱ्याच्या भूमिकेत रुजू झाला. तेव्हापासून आतापर्यंत 249 सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे. नेपाळ विरुद्ध भारत हा 250 वा सामना असणार आहे.
3 / 7
श्रीनाथ याने इतका मोठा टप्पा गाठल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. "एक सामनाधिकारी म्हणून इतका मोठा पल्ला गाठणं चांगलं वाटतं. मला हे काम करताना 17 वर्षे पूर्ण झाली आहे. मला विश्वास बसत नाही की, मी आतापर्यंत जितके वनडे सामने खेळलो त्यापेक्षा अधिक वनडेसाठी मी ही भूमिका बजावली आहे."
4 / 7
"निवृत्तीनंतरही खेळासोबत राहण्याचं मला सौभाग्य लाभलं. मी 2006 साली कोलंबोत श्रीलंका विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी सामन्यात सामनाधिकारी म्हणून पहिल्यांदा भूमिका बजावली होती. आतापर्यंतचा प्रवास खरंच खूप छान होता. मी येत्या वर्षात आणखी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन.", असंही श्रीनाथने पुढे सांगितलं.
5 / 7
श्रीनाथने पहिल्यांदा 2006 मध्ये आयसीसी सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावली. आयसीसी क्रिकेट विश्वकप 2007, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2009 आणि 2013, आयसीसी टी20 विश्वकप (2012, 2014, 2016 आणि 2021) मध्ये सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावली.
6 / 7
जवागल श्रीनाथने 65 कसोटी, 118 पुरुष टी20 आंतरराष्ट्रीय आणि 16 महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका बजावली.
7 / 7
जवागल श्रीनाथ याने भारतासाठी 67 कसोटी 236 आणि 219 वनडे सामन्यात 315 गडी बाद केले आहेत.