Asia Cup 2023 PAK vs IND | टीम इंडिया की पाकिस्तान, बॉलिंग अटॅक कोणाचा भारी?
Pakistan vs India Asia Cup 2023 | पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आशिया कप 2023 स्पर्धेत 2 सप्टेंबरला भिडणार आहेत. या दोन्ही संघांमध्ये धारदार बॉलिंग टाकणारे बॉलर्स आहेत.
1 / 7
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध आशिया कप 2023 मोहिमेची सुरुवात करणार आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील महामुकाबला 2 सप्टेंबरला होणार आहे. दोन्ही संघात तोडीसतोड गोलंदाज आहेत, जे आपल्या बॉलिंगच्या जोरावर सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता ठेवतात.
2 / 7
पाकिस्तानचा फास्टर बॉलर हारिस रऊफ याने या वर्षात 10 वनडे सामन्यांमध्ये 17 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांना जरा जपूण खेळावं लागणार आहे.
3 / 7
मोहम्मद सिराज याच्या बॉलिंगकजे सर्वांच्या नजरा असणार आहेत. सिराज विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 5 विकेट्स घेतल्या होत्या. सिराजच्या बॉलिंगची धार पाकिस्तान विरुद्ध दिसते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल.
4 / 7
मोहम्मद शमी याने आतापर्यंत 90 वनडेंमध्ये 162 विकेट्स घेतल्या आहेत. शमी टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज आहे. त्यामुळे शमीवर टीमला झटपट विकेट मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.
5 / 7
पाकिस्तानच्या नसीम शाह याने 2023 मध्ये 8 सामने खेळले आहेत. नसीमने या 8 सामन्यात दुप्पट म्हणजे 16 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे लढाई ही बरोबरीच असणार आहे.
6 / 7
शाहीन शाह अफ्रिदी हा पाकिस्तानचा मुख्य गोलंदाज आहे. शाहिनने आतापर्यंत 2023 वर्षात 8 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. पाकिस्तान आशिया कपआधी अफगाणिस्तान विरुद्ध वनडे सीरिज खेळली. शाहिनने या मालिकेत 6 विकेट्स घेतल्या होत्या.
7 / 7
जसप्रीत बुमराह दुखापतीनंतर जवळपास वर्षभरानंतर टीममध्ये परतला. बुमराहने आयर्लंड विरुद्धच्या टी 20 सीरिजमधून कमबॅक केलं. बुमराहने 2 सामन्यांमध्ये 4 विकेट्स घेतल्या. आता बुमराह पाकिस्तान विरुद्ध कसा खेळतो, याकडे साऱ्या भारतीय चाहत्यांची करडी नजर असणार आहे.