IND vs PAK : कोहली आणि केएल राहुल यांच्या भागीदारीने मोडला 11 वर्षे जुना रेकॉर्ड, काय ते वाचा
आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांची बॅट चांगलीच तळपली. या दोघांनी 233 धावांची भागीदारी करत 11 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.
1 / 6
आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. तसेच नाबाद 233 धावांची भागीदारी केली. या भागीदारीसह 11 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला आहे.
2 / 6
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शेवटच्या षटकांमध्ये आक्रमक खेळी केली. विराट कोहली याने 9 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 122 धावा केल्या. तर केएल राहुलने 106 चेंडूत 111 धावा केल्या.
3 / 6
आशिया कप स्पर्धेत कोणत्याही जोडीने 233 धावांची भागीदारी केली नव्हती. यापूर्वी हा विक्रम मोहम्मद हफीज आणि नसिर जमशेद यांच्या नावावर होता. आशिया कप 2012 मध्ये भारताविरुद्ध 224 धावांची भागीदारी केली होती.
4 / 6
विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पाकिस्तान विरोधात 233 धावांची भागीदारी, मोहम्मद हफीज आणि नासिर जमशेद यांनी 2012 मध्ये 224 धावांची भागीदारी, यूनिस खान आणि शोएब मलिक यांनी 2004 मध्ये 223 धावांची भागीदारी, बाबर आझम आणि इफ्तिखार अहमद यांनी 2023 मध्ये 214,विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी 2014 मध्ये 213 धावांची भागीदारी केली आहे.
5 / 6
विराट कोहली याने 98 धावा करताच वनडे क्रिकेटमध्ये 13 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा पाचवा फलंदाज आहे.
6 / 6
केएल राहुल यानेही दुखापतीनंतर जोरदार कमबॅक केलं. सहा महिन्यानंतर मैदानात परतत शतक ठोकलं. त्यामुळे भारताचा चौथ्या स्थानाचा प्रश्न सुटला आहे.