Asia Cup : आशिया कप स्पर्धेत असा होईल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, वाचा काय ते
आशिया कप स्पर्धेची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. सामने कोणत्या मैदानात होणार याबाबत चर्चेचं गुऱ्हाळ सुरु होतं. अखेर यावर पडदा पडला असून मैदानाचं ठरलं आहे.
1 / 6
15 वर्षानंतर पाकिस्तानात आशिया कपचं आयोजन करण्यात आलं आहे. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर दरम्यान सामने होणार आहेत.
2 / 6
भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर होणार आहे. आशिया कपचे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळले जाणार आहे.
3 / 6
टीम इंडिया सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. तर 2 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असणार आहे. एसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
4 / 6
आशिया चषकात एकूण सहा संघ असून तीन संघाचे दोन गट तयार केले आहेत. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ एका गटात, तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका दुसऱ्या गटात असतील.
5 / 6
दोन गटातील टॉप दोनमध्ये असलेले संघ सुपर फोरमध्ये क्वालिफाय करतील. यातील टॉप दोनचे संघ अंतिम फेरीत खेळतील. आशिया कप स्पर्धा 50 षटकांची असेल.
6 / 6
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ हा सामना मुल्तानमध्ये, बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान सामना लाहोरमध्ये, अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका सामना लाहोरमध्ये, तर सुपर फोरमधील एक सामना लाहोरमध्ये होणार आहे.