Asia Cup 2023 | आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तान शिवाय आणखी कोणत्या टीम विरुद्ध खेळणार?

| Updated on: Aug 29, 2023 | 9:28 PM

Indian Cricket Team Matches in Asia Cup 2023 | आशिया कप स्पर्धेचा थरार 30 ऑगस्टपासून रंगणार आहे. आशिया कपमधील टीम इंडियाच्या सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार हे जाणून घ्या.

1 / 7
वर्ल्ड कपआधी 30 ऑगस्टपासून आशिया कप 2023 स्पर्धेला सुरुवात होतेय. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने आशिया कप मोहिमेला सुरुवात करणार आहे. आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला टीम इंडिया- पाकिस्तान असा सामना होणार आहे.

2 / 7
टीम इंडिया आशिया कपमध्ये रोहित शर्मा याच्या नेतृत्वात खेळणार आहे. दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघ 2 सप्टेंबरला आमनेसामने असणार आहेत.

3 / 7
टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना हा श्रीलंकेतील कँडी येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

4 / 7
टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ हे 3 संघ ए ग्रुपमध्ये आहेत. एकूण 6 संघ 2 ग्रुपमध्ये विभागले गेले आहेत.

5 / 7
टीम इंडिया विरुद्ध नेपाळ  4 सप्टेंबरला आमनेसामने असणार आहेत. हा सामना श्रीलंकेतील पल्लकले इथे होणार आहे. या सामन्यालाही दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे.

6 / 7
तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे 3 संघ बी ग्रुपमध्ये आहेत. दोन्ही ग्रुपमधील पहिले 2 संघ सुपर 4 साठी क्वालिफाय करतील.

7 / 7
सुपर 4 मधून दोन्ही ग्रुपमधील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. आशिया कपमधील अंतिम सामना हा 17 सप्टेंबरला कोलंबोत पार पडणार आहे.