PAK vs IND | पाकिस्तानला पावसामुळे मजबूत फायदा, टीम इंडिया विरुद्ध सामना रद्द झाल्याने काय झालं?

| Updated on: Sep 03, 2023 | 5:03 PM

Pakistan vs India Asia Cup 2023 | टीम इंडिया विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे पाकिस्तानला मोठा फायदा झालाय. बाबर आझम याच्या नेतृत्वात पाकिस्तान आशिया कप 2023 मध्ये मोठी कामगिरी करणारी पहिलीच टीम ठरलीय.

1 / 5
आशिया कप 2023 मधील  पाक विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. पाकिस्तान क्रिकेट टीमला पावसामुळे एका अर्थाने फायदाच झाला.  पाकिस्तानने सुपर 4 मध्ये प्रवेश केलाय. टीम इंडियाने पहिले बॅटिंग करताना 266 धावाकेल्या. मात्र पावसामुळे पाकिस्तानच्या बॅटिंगची संधीच मिळाली नाही.

2 / 5
सामना रद्द झाल्याने पाकिस्तान-टीम इंडिया दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 पॉइंट मिळाला. पाकिस्तानने आधीच नेपाळवर 238 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्ताच्या खात्यात एकूण 3 पॉइंट्स झाले. पाकिस्तानने यासह सुपर 4 मध्ये एन्ट्री केली.

3 / 5
पाकिस्तानचा सुपर 4 मधील पहिला सामना 6 सप्टेंबरला लाहोरमध्ये पार पडेल. त्यानंतर दुसरा सामना हा कोलंबोत 10 सप्टेंबरला होईल. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान असा सामना होऊ शकतो. तर पाकिस्तान तिसरा सामना हा 14 सप्टेंबर खेळेल.

4 / 5
टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध  266 धावा केल्या. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने निराशा केली. त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या या दोघांनी शतकी भागीदारी केली आणि डाव सावरला. हार्दिकने 87 आणि इशानने 82 धावा केल्या. या दोघांनी केलेल्या 138 धावांच्या भागीदारीमुळे टीम इंडियाला 250 पेक्षा अधिक धावा करता आल्या.

5 / 5
पाकिस्तान क्रिकेट टीमकडून शाहीन अफ्रिदी याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या बाजूने हरीस रऊफ आणि नसीम शाह या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत शाहीनला चांगलीच साथ दिली.