Asia Cup 2023 | India vs Pakistan सामन्यात हे 6 बॉलर निभावणार निर्णायक भूमिका
Pakistan vs India Asia Cup 2023 | आशिया कप 2023 मधील तिसरा सामना हा हायव्होल्टेज असणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाचे 6 गोलंदाज सामन्याचा निकाल बदलू शकतात.
1 / 10
आशिया कप 2023 स्पर्धेत 2 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहेत. या महामुकाबल्यावर क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.
2 / 10
पाकिस्तान आणि टीम इंडिया दोन्ही संघात एकसेएक गोलंदाज आहेत. या गोलंदाजांमध्ये सामना पालटण्याची ताकद आहे.
3 / 10
या सामन्याआधी टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघातील त्या 6 गोलंदाजांबाबत जाणून घेणार आहोत, जे फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरु शकतात.
4 / 10
पाकिस्तानचा शाहीन अफ्रिदी तुफान फॉर्ममध्ये आहे. शाहीनने गेल्या 5 वनडे मॅचमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत.
5 / 10
पाकिस्तानचा नसीम शाह युवा गोलंदाज टीम इंडियासाठी धोकादायक ठरु शकतो. नसीमने आतापर्यंत 11 वनडेत 26 विकेट्स घेतल्या आहेत.
6 / 10
हारिस रऊफ याने 25 वनडे सामन्यांमध्ये 46 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. हारीस रौफ निर्णायक भूमिका बजावू शकतो.
7 / 10
टीम इंडियाचा हुकमाचा एक्का यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यातून कमबॅक केलंय. बुमराह आपल्या भेदक यॉर्करच्या जोरावर पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरु शकतो. बुमराहने पाकिस्तान विरुद्धच्या 5 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत.
8 / 10
मोहम्मद सिराज याला संधी मिळाल्यास पाकिस्तान विरुद्ध खेळण्याची त्याची पहिलीच वेळ ठरेल. मोहम्मद सिराजने 2023 वर्षात बॉलिंगने छाप पाडली आहे.
9 / 10
मोहम्मद शमी याला 90 वनडे सामन्यांचा अनुभव आहे. शमीने 90 सामन्यांमध्ये 162 विकेट्स घेतल्या आहेत.
10 / 10
तसेच मोहम्मद शमी याने पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या 3 वनडेंमध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. अशात टीम इंडियाच्या या तिकडीवर सर्वांच लक्ष असेल.