PAK vs IND Super 4 | कोलंबोत येणार ‘विराट’ वादळ, कोहली पाकिस्तान विरुद्ध ‘धमाका’ करण्यासाठी सज्ज
Pakistan vs India Super 4 Asia CUP 2023 | क्रिकेट चाहते 10 सप्टेंबरची आवर्जुन वाट पाहत आहेत.आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हे कट्टर प्रतिस्पर्धी सुपर 4 राउंडमध्ये भिडणार आहेत. विराट या सामन्यात पाकिस्तानची धुलाई करण्यासाठी तयार आहे.
1 / 6
टीम इंडिया-पाकिस्तान आशिया कप 2023 स्पर्धेत 10 सप्टेंबर रोजी आमनेसामने असणार आहेत. हा सामना सुपर 4 मधील आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.
2 / 6
टीम इंडियाचा 'रनमशीन' विराट याचे या स्टेडियममध्ये अफलातून आकडे आहेत. त्याने आतापर्यंत कोलंबोत खेळलेल्या तिन्ही सामन्यात शतकं ठोकली आहेत. त्यामुळे पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातही विराटकडून तशाच शतकी खेळीची अपेक्षा आहे.
3 / 6
विराटने श्रीलंका विरुद्ध जुलै 2012 मध्ये कोलंबोत नाबाद शतक झळकावलं. विराटने तेव्हा 119 बॉलमध्ये नॉट आऊट 128 धावा केल्या.
4 / 6
त्यानंतर विराटने 2017 मध्ये एकाच वर्षात 2 शतकं ठोकली. विराटने ऑगस्ट 2017 मध्ये 131 धावांची शतकी खेळी केली. विराटने या 131 धावा अवघ्या 96 चेंडूत केल्या.
5 / 6
तर 1 महिन्याच्या अंतराने सप्टेंबर 2017 मध्ये विराटने पुन्हा खणखणीत शतक पूर्ण केलं. विराटने तेव्हा 116 बॉलमध्ये नाबाद 110 धावा केल्या. त्यामुळे विराटचं आर प्रेमदासा स्टेडियम हे आवडतं आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
6 / 6
टीम इंडियाचा सुपर 4 मधील पहिलाच सामना हा पाकिस्तान विरुद्ध आहे. त्यामुळे कोलंबोच्या याच मैदानात विराटकडून पाकिस्तान विरुद्ध चौथ्या शतकाची अपेक्षा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे.