Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची सोमवारी होणार घोषणा, केएल राहुल याची निवड जवळपास निश्चित
Asia Cup 2023 : आशिया कप 2023 स्पर्धेसाठी बीसीसीआय सोमवारी (21 ऑगस्ट 2023) टीम इंडियाची घोषणा करणार आहे. या संघात केएल राहुल याला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर श्रेयस अय्यर बाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
1 / 8
आशिया कप 2023 स्पर्धेसाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मात्र या स्पर्धेसाठी अजूनही टीम इंडियाची निवड केलेली नाही. त्यामुळे कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार या बाबत प्रचंड उत्सुकता आहे. जसप्रीत बुमराह यानेही जबरदस्त कमबॅक केलं आहे.
2 / 8
21 ऑगस्ट 2023 रोजी टीम इंडियाची निवड केली जाईल असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फिटनेसबाबत बीसीसीआयने काही दिवस वाट पाहिली आणि आता संघ जाहीर करण्यचा निर्णय घेतला आहे.
3 / 8
बीसीसीआय 21 ऑगस्टला संघाची घोषणा करणार असल्याने याआधी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांची फिटनेस चाचणी होण्याची शक्यता आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार केएल राहुल फिट असून संघातील स्थान जवळपास निश्चित आहे.
4 / 8
केएल राहुल आणि श्रेयस अय्यर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करत आहे. पण केएल राहुल आणि श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे दोन्ही खेळाडूंना प्राधान्य मिळू शकतं. पण सर्वात आधी फिटनेस चाचणीला सामोरं जावं लागणार आहे.
5 / 8
केएल राहुल हा वनडे क्रिकेटमधील आघाडीचा यष्टीरक्षक आहे. त्यामुळे त्याला स्थान मिळेल हे जवळपास निश्चित आहे. पण चौथ्या स्थानाची अडचण दूर करण्यासाठी श्रेयस अय्यरचा विचार केला जाता आहे. त्यामुळे या दोघांनी निवड महत्त्वाची ठरणार आहे.
6 / 8
आयपीएल 2023 मध्ये क्षेत्ररक्षण करताना राहुलला दुखापत झाली होती. यामुळे केएल राहुलला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमधून बाहेर पडावे लागले. तसेच बॉर्डर-गावस्कर कसोटी स्पर्धेदरम्यान श्रेयस अय्यरच्या पाठीला दुखापत झाली होती. शस्त्रक्रियेनंतर त्याला आयपीएल 2023 मधून माघार घ्यावी लागली.
7 / 8
रोहित शर्मा आशिया कप 2023 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. हार्दिक पांड्या उपकर्णधार आहे. आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. भारत 2 सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. दुसरीकडे, आयसीसी एकदिवसीय विश्वचषक आशिया चषकानंतर होणार आहे.
8 / 8
आशिया कप 2023 साठी भारताचा संभाव्य संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.