Virat Kohli : विराट कोहली याने झेल घेत केली विक्रमाची नोंद, नेमकं काय केलं ते वाचा
IND vs NEP, Asia Cup 2023 : विराट कोहली याने नेपाळ विरुद्धच्या सामन्यात एक झेल सोडल्यानंतर टीकेचा धनी होत आहे. दुसरीकडे, याच सामन्यात त्याने एक झेल घेतला आणि विक्रमाची नोंद केली आहे. नक्की काय केलं वाचा
1 / 6
2 / 6
नेपाळ विरुद्धच्या सामन्यात आसिफ शेखचा झेल घेत बहुराष्ट्रीय स्पर्धेत 100 झेल घेणारा दुसरा भारतीय ठरला. तसेच भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने बहुराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक झेल घेतले आहेत.
3 / 6
4 / 6
श्रीलंकेचा महेला जयवर्धने अव्वल स्थानावर आहे. जयवर्धने 218 कॅचसह अव्वल, तर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग 160 कॅचसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचप्रमाणे भारताच्या अझरुद्दीनने 156 कॅचसह तिसऱ्या, तर विराट कोहलीने 143 कॅचसह चौथ्या स्थानावर आहे.
5 / 6
अवघ्या 277 वनडे सामन्यांमध्ये एकूण 143 झेल घेणारा विराट कोहली चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याद्वारे त्याने क्षेत्ररक्षणातही नवा विक्रम रचण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
6 / 6
आगामी सामन्यांमध्ये विराट कोहली याने 14 झेल पकडले तर विराट कोहली टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू ठरेल. कोहलीकडून आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.