IND vs PAK, Asia Cup 2023 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर पुढे काय? जाणून घ्या कसं असेल पुढचं गणित
Asia Cup 2023 India vs Pakistan Match : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना श्रीलंकेतील पल्लेकेले मैदानात होणार आहे. या सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्यामुळे सामना पावसामुळे रद्द झाला किंवा सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली, तर कसं असेल गणित ते जाणून घ्या.
1 / 8
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. या सामन्याची गेल्या काही दिवसांपासून क्रीडाप्रेमी आतुरतेने वाट पाहात आहेत. या सामन्यात कोण बाजी मारणार? कोणता खेळाडू कमाल करणार? याबाबतची चर्चा सुरु असताना एक वाईट बातमी समोर आली आहे. या सामन्यात पाऊस पडेल असं सांगण्यात येत आहे.
2 / 8
भारत आणि पाकिस्तान सामन्यात पाऊस पडेल अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. AccuWeather.com नुसार, श्रीलंकेच्या पल्लेकेलमध्ये पाऊस पडेल असा अंदाज आहे. तर वादळाची शक्यताही वर्तवण्यात आलं आहे. पाऊस पडला नाही तरी इथलं वातावरण मात्र ढगाल असणार आहे.
3 / 8
श्रीलंकेत ऑगस्ट-सप्टेंबर या महिन्यात मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे या कालावधीत श्रीलंकेत स्पर्धाचं आयोजन केलं जात नाही. मात्र भारताने पाकिस्तान सामने खेळण्यास नकार दिल्याने या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे आता सामना होईल की नाही याबाबत चर्चेला उधाण आलं आहे.
4 / 8
भारत विरुद्ध पाकिस्तान सामनाच नाही, तर भारत विरुद्ध नेपाळ या सामन्यावरही पावसाचं सावट आहे. हा सामना 2 सप्टेंबर 2023 रोजी श्रीलंकेत होणार आहे. या दिवशी पावसाची 76 टक्के शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजामुळे भारताचं गणित बिघडू शकतो.
5 / 8
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामन्यात हजेरी लावली तर कसं असेल गणित? जाणून घ्या. असं झालं तरच डकवर्थ लुईस नियमानुसार निकाल दिला जाईल. उरलेली षटकं आणि विकेटच्या आधारावर गणना केली जाते.
6 / 8
दुसऱ्या डावात फलंदाजी वेळी पावसाने व्यत्यय आणला किंवा दुसरा डाव सुरू होण्यापूर्वी पाऊस पडला, तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने टाकावयाच्या षटकांच्या संख्येच्या टक्केवारीने गुणाकार केला जातो.
7 / 8
पावसामुळे सामना झालाच नाही तर यासाठी कोणताही दिवस राखीव ठेवलेला नाही. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. यासह पाकिस्तान सुपर 4 मध्ये एन्ट्री मारेल. तर भारताला 4 सप्टेंबर रोजी नेपाळला पराभूत करावं लागणार आहे.
8 / 8
टीम इंडियाने पल्लेकेल येथे आतापर्यंत तीन सामने खेळले असून तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. एका सामन्यात विजयी आव्हान दिलं होतं. तर दोन सामन्यात विजयी आव्हान गाठलं होतं. त्यामुळे हे मैदान भारतासाठी लकी आहे, असंच म्हणावं लागेल.