Asia Cup 2023 : सुपर 4 फेरीतील श्रीलंका बांगलादेश सामन्यासाठी दोन दिवसांचं अंतर का? जाणून घ्या कारण

| Updated on: Sep 08, 2023 | 4:44 PM

Asia Cup 2023 : आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 फेरीचे सामने सुरु झाले आहेत. पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश सामना झाल्यानंतर दोन दिवसांचं अंतर ठेवण्यात आलं आहे. आता श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यात 9 सप्टेंबरला सामना होणार आहे. पण या सामन्यासाठी दोन दिवसांचा अवधी का देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

1 / 7
आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानची विजयी घोडदौड सुरुच आहे. सुपर 4 फेरीत बांगलादेशला पराभूत केलं . मात्र या सामन्यानंतर 7 आणि 8 सप्टेंबरला कोणत्याही सामन्यात आयोजन करण्यात आलं नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला आहे. या मागे खास कारण आहे जाणून घेऊयात.

2 / 7
आशिया कप स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी सुपर 4 मध्ये एन्ट्री मारली आहे. या फेरीतील पहिला सामना पाकिस्तानात झाला. आता पुढील सामना श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे.

3 / 7
बांगलादेश आणि श्रीलंका याच्यातील सामना श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे पाकिस्तानात खेळलेल्या बांगलादेश संघाची बरीच ओढताण झाली. त्यामुळे लंकेत जाण्यासाठी वेळ मिळावा. तसेच खेळाडूंना विश्रांती मिळावी यासाठी 8 सप्टेंबरला सामन्याचं आयोजन केलं नाही.

4 / 7
श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात 9 सप्टेंबरला सामना होणार आहे. कोलंबोतील प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. बांगलादेशसाठी हा करो या मरोचा सामना असणार आहे.

5 / 7
भारताचा सुपर 4 मधील पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना 10 सप्टेंबरला कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे.

6 / 7
कोलंबोत गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्व संघ कोलंबोत असले तरी मैदानावर सराव करणं कठीण झालं आहे. त्यामुळे टीम इंडियाचे खेळाडू इनडोअर स्टेडियममध्ये सराव करतील.

7 / 7
आशिया कप स्पर्धेतील सुपर 4 आणि अंतिम फेरीच्या सामन्याचं ठिकाण बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एशियन क्रिकेट काउंसिलने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ठरलेल्या ठिकाणांमध्ये कोणताही बदल होणार नाही.