भारताने एशियन गेम्स स्पर्धेतील हॉकीमध्ये पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. भारताने पाकिस्तानचा 10-2 ने पराभव केला. पाकिस्तान विरुद्ध भारताचा हा सर्वात मोठा विजय आहे. (Photo : Twitter)
हरमनप्रीतने 11 व्या, 33 व्या आणि 34 व्या मिनिटाला गोल केला. वरूण कुमारने 41 व्या आणि 54 व्या मिनिटाला गोल केला. मनदीप सिंहे आठव्या, सुमितने 30 व्या, शमशेर सिंहने 46 व्या आणि ललित कुमार उपाध्याय याने 49 व्या मिनिटाला गोल केला. (Photo : Twitter)
दोन्ही संघात हा 180 वा सामना होता आणि भाराताने पाकिस्तानवर 8 गोलच्या च्या फरकाने विजय मिळवला. पाकिस्तानने यापूर्वी भारताने याच फरकाने विजय मिळवला होता. 41 वर्षानी टीम इंडियाने वचपा काढला आहे. (Photo : Twitter)
पाकिस्तानने 1982 मध्ये दिल्लीत झालेल्या एशियन गेम्समध्ये भारताचा असाचा धुव्वा उडवला होता. आता भारताने त्याची परतफेड केली आहे. (Photo : Twitter)
भारतीय संघाने ग्रुप ए मध्ये सलग 4 सामने जिंकत अव्वल स्थान गाठलं आहे. टीम इंडियाचा पूलमधील शेवटचा सामना बांगलादेशसोबत 2 ऑक्टोबरला होणार आहे. (Photo : Twitter)