Asian Games : शफाली वर्मा हीने 39 चेंडूत ठोकल्या 67 धावा, पुरुष आणि महिला क्रिकेटर्समध्ये मिळवलं अव्वल स्थान
Asian Games 2023, Team India Women : एशियन गेम्स 2023 स्पर्धेत महिला क्रिकेटर शफाली वर्मा हीने वादळी खेळी केली. उपांत्यपूर्व फेरीत 39 चेंडूत 67 धावा केल्या आणि काही विक्रमांची नोंद केली आहे. चला जाणून घेऊयात
1 / 6
एशियन गेम्स 2023 च्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा पहिला सामना मलेशियाशी झाला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण होऊ शकला नाही. असं होऊनही टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
2 / 6
भारताने 15 षटकात 2 गडी गमवून 173 धावा केल्या होत्या. दुसरीकडे, मलेशियाला 2 चेंडूत फक्त एक धाव करता आली आणि पावसाने हजेरी लावली. गुणांकनाच्या आधारावर भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळालं.
3 / 6
भारतीय कर्णधार स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा यांच्यात पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी झाली. दुसऱ्या विकेटसाठी शफाली आणि जेमिमा यांच्यात 86 धावांची भागीदारी झाली. यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.
4 / 6
शफाली वर्मा हीने 39 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 67 धावा केल्या. यासह तिने काही विक्रमांची नोंद केली. एशियन गेम्समध्ये भारताकडून पहिलं अर्धशतक ठोकणारी फलंदाज ठरली आहे.
5 / 6
शफाली वर्मा टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (पुरुष आणि महिला गटात) सर्वात कमी वयात 50 षटकार ठोकणारी पहिली फलंदाज ठरली आहे. वयाच्या 19 व्या वर्षी तिने ही कामगिरी केली आहे.
6 / 6
टी20 क्रिकेटमध्ये हा विक्रम रहमानुल्लाह गुरबाज याच्या नावावर होता. त्याने वयाच्या 20 व्या वर्षी ही कामगिरी केली होती. शफाली वर्मा हीने 20 सामन्यात आतापर्यंत 53 षटकार मारले आहेत.