Asian Games : तिलक वर्मा याने दोनच दिवसात मोडला यशस्वी जयस्वालचा रेकॉर्ड, युवराज आणि हार्दिकच्या पंगतीत स्थान
Asian Games, IND vs BAN : उपांत्य फेरीत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत झाली. तिलक वर्मा याने या सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी केली आणि यशस्वी जयस्वाल याचा दोन दिवस जुना विक्रम मोडीत काढला.
1 / 6
एशियन गेम्स 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.
2 / 6
उपांत्य फेरीत टीम इंडियाने तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली आहे. तिलक वर्मा याने 26 चेंडूत 55 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाल याने दोन दिवसापूर्वी केलेला विक्रम मोडीत काढला आहे.
3 / 6
तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा तरूण फलंदाज बनला आहे. यापूर्वी यशस्वी जयस्वाल याने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ विरुद्ध 49 चेंडूत 100 केल्या होत्या. मात्र हा विक्रम दोन दिवसात मोडला गेला आहे.
4 / 6
यशस्वी जयस्वाल याने 21 वर्षे 279 दिवसात ही कामगिरी केली होती. तर तिलक वर्मा याने 20 वर्षे आमि 332 दिवसात ही कामगिरी केली आहे. यामुळे कमी वयात बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा युवा फलंदाज ठरला आहे.
5 / 6
भारताकडून उपांत्य फेरीत 50 हून अधिक धावा करणार चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी ही कामगिरी केली आहे. यात युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी एकदा ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने तीन वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
6 / 6
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बाद फेरीत 50 हून अधिक धावा आणि एक विकेट घेण्याची किमया 2016 मध्ये विराट कोहलीने केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. आता 7 वर्षानंतर असंच तिलक वर्मा याने केलं आहे. 55 धावा करत एक गडी बाद केला आहे.