Asian Games : रात्री न झोपण्याच्या सवयीने तितस साधु बनली क्रिकेटपटू, एशियन्स गेम्समध्ये गोल्ड मिळवून देण्यात मोठं योगदान

| Updated on: Sep 25, 2023 | 10:19 PM

Asian Games 2023 : भारतीय वुमन्स क्रिकेट संघाने अपेक्षेप्रमाणे एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल पटकावलं. श्रीलंकेला अंतिम सामन्यात 19 धावांनी पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. या सामन्यात तितस साधु हीने जबरदस्त गोलंदाजी केली. पण तिचा इथपर्यंतचा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता.

1 / 6
एशियन गेम्स 2023 वुमन्स क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेला पराभूत करत भारताने सुवर्ण कामगिरी केली. श्रीलंकेला 19 धावांनी पराभूत केलं. या सामन्यात तितस साधु हीच्या कामगिरीने क्रीडाप्रेमी प्रचंड खूश आहेत.

2 / 6
अंतिम सामन्यात स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्स सोडले तर एकही जण दुहेरी आकडा गाठू शकले नाही. टीम इंडियाने फक्त 116 धावा केल्या आणि विजयासाठी 117 धावांचं आव्हान दिलं. असं असूनही टीम इंडियाने विजयश्री खेचून आणला.

3 / 6
तितस साधु हीने 4 षटकात फक्त 6 धावा देत 3 गडी बाद केले. तसेच एक षटक निर्धाव टाकलं. तितस साधु हीने दुसऱ्यांदा फायनलमध्ये जिंकवलं आहे. अंडर 19 वर्ल्डकप फायनलमध्ये तिने अशीच कामगिरी केली होती. तिने 6 धावा देत दोन गडी बाद केले होते.

4 / 6
तितस लहानपणापासूनच क्रिकेट खेळत आहे. तिचे वडील अॅकाडमी चालवतात. 13 वर्षांची असताना तिने बंगाल संघासाठी अर्ज दिला होता. मात्र हा अर्ज फेटाळून लावण्यात आला होता.

5 / 6
तितसच्या आईने दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, माझी मुलगी रात्रभर झोपायची नाही. त्यामुळे तिला दिवसा ट्रेनिंगसाठी मैदानावर पाठवायचो.

6 / 6
तितसकडे क्षमता चांगली असल्याने तिने वेगवान गोलंदाज होण्याचा निर्णय घेतला. अंडर 16 आणि अंडर 18 स्तरावर तिने मुलांसोबत खूप क्रिकेट खेळलं आहे.