IND vs SL | राष्ट्रगीत, तिरंगा आणि सुवर्णपदक, टीम इंडियाच्या वाघिणींची चीनमध्ये ऐतिहासिक कामगिरी

| Updated on: Sep 25, 2023 | 4:35 PM

Womens Team india Win Gold Medal In Asian Games 2023 | टीम इंडियाच्या सर्वच खेळाडूंना सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रगीत सुरु झालं. तर दुसऱ्या बाजूला भारताचा तिरंगा हा हवेत डौलाने फडकत होता. हे क्षण भारतीयांना वेगळीच उर्जा देणारे ठरले.

1 / 7
महिला क्रिकेट टीम इंडियाने एशियन गेम्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात श्रीलंका टीमवर 19 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह चीनमध्ये सुवर्ण पदक पटकावलं.

2 / 7
श्रीलंकेला अंतिम सामन्यात विजयासाठी 117 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी लंकेला 97 धावाच करु दिल्या.

3 / 7
टीम इंडियाकडून तिटास साधू हीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. विशेष बाब म्हणजे तिटासने श्रीलंकेला पहिले 3 आणि झटपट धक्के दिले.

4 / 7
त्याआधी टीम इंडियाकडून स्मृती मंधाना हीने सर्वाधिक 46 धावा केल्या. स्मृतीने या दरम्यान 4 चौकार आणि 1 षटकार ठोकला.

5 / 7
तसेत जेमिमाह रॉड्रिग्स सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज ठरली. जेमिमाह हीने 42 रन्स केल्या.

6 / 7
वूमन्स टीम इंडियाने पहिल्याच झटक्यात एशियन गेम्समध्ये गोल्डन मेडल जिंकत इतिहास रचला. टीम इंडियावर या विजयानंतर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

7 / 7
टीम इंडियाला अखेरीस सुवर्ण पदक देऊन गौरवण्यात आलं. त्यानंतर टीम इंडिया नंबर 1 ठरल्याने राष्ट्रगीत वाजवण्यात आलं. तर दुसऱ्या बाजूला भारताचा तिरंगा डौलाने फडकत होता. हा क्षण प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद होता. हा क्षण पाहून प्रत्येकाच्या अंगावर शहारे उभे राहिले.