AUS vs AFG: जादरानचं विक्रमी शतक! अफगाण खेळाडूने पहिल्यांदाच रचला इतिहास
Ibrahim Zadran : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत अफगाणिस्तानने जबरदस्त कामगिरी केली आहे. तीन दिग्गज संघांना पराभूत करत अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी केली.
1 / 6
अफगाणिस्ताने आपल्या खेळीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावणारा जादरान हा अफगाणिस्तानचा पहिला खेळाडू आहे.
2 / 6
21 वर्षीय जादरानने जोश हेझलवूडच्या चेंडूवर दोन धावा घेत आपलं शतक पूर्ण केलं. शतकी खेळीसाठी त्याने 131 चेंडू घेतले.
3 / 6
समिउल्लाह शिनवारी याने 2015 वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध 147 चेंडूत 96 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजाची ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या होती.
4 / 6
या विश्वचषकात चेन्नईत पाकिस्तानविरुद्ध जादरानने 87 धावांची खेळी केली होती. अफगाणिस्तानच्या फलंदाजाची या स्पर्धेतील तिसरी सर्वोच्च धावसंख्या ठरली.
5 / 6
21 वर्षे आणि 330 दिवसांचा जादरन हा विश्वचषकात शतक झळकावणारा चौथा तरूण खेळाडू ठरला आहे. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग, ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आणि श्रीलंकेचा अविष्का फर्नांडो यांच्यानंतर त्याचा नंबर लागला आहे.
6 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठणं शक्य होऊ शकते. त्यामुळे गुण आणि रनरेटच्या आकडेवारीत अफगाणिस्तानचं गणित बसलं तर उपांत्य फेरी गाठली तर आश्चर्य वाटायला नको.