मिचेल स्टार्कचं पाकिस्तानविरुद्धच्या वनडेत ‘शतक’, अशी कामगिरी करणारा सहावा गोलंदाज

| Updated on: Nov 04, 2024 | 4:00 PM

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 2 गडी राखून विजय मिळवला. असं असलं तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचं शतक लक्षवेधी ठरलं. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज ठरला आहे. पाकिस्तानने 204 धावांचं आव्हान ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने 8 गडी गमवून पूर्ण केलं.

1 / 5
ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा गोलंदाज मिचेल स्टार्कने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात कमाल केली. 10 षटकात 3 षटकं निर्धाव टाकली. तसेच तीन गडी बाद केले. या सामन्यात सईम अयुबची विकेट घेताच एक अनोखं शतक आपल्या नावावर केलं आहे.

2 / 5
मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारा सहावा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ब्रेटलीने 169, ग्लेन मॅग्राने 161, शेन वॉर्नने 136, क्रेग मॅकडरमॉटने 125 आणि स्टीव्हा वॉने 101 विकेट घेतल्या आहेत.

3 / 5
मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियात 100 विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बसला असला तरी अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा पहिला डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.

4 / 5
मिचेल स्टार्क 126 वनडे सामने खेळला असून त्याने 6488 चेंडूत टाकले आहेत. तसेच 244 विकेट्स घेतल्या आहेत. नऊ वेळा त्याने पाच विकेट घेतल्या आहेत. तर 28 धावा देत 6 विकेट ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

5 / 5
मिचेल स्टार्कने ऑक्टोबर 2010 मध्ये भारताविरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आता वनडे क्रिकेट खेळून 14 वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र अजूनही त्याच्या गोलंदाजी धार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये सर्वाधिक रक्कम घेत नावावर विक्रम नोंदवला आहे.