AUS vs WI : डेविड वॉर्नरने 100 व्या टी20 सामन्यात रचले अनेक विक्रम, काय ते वाचा
ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. पहिला टी20 सामना ऑस्ट्रेलियाने 11 धावांनी जिंकला. या सामन्यात 70 धावांची खेळी करणाऱ्या डेविड वॉर्नरने अनेक विक्रम रचले.
1 / 6
वनडे आणि कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर डेविड वॉर्नर टी20 क्रिकेट खेळत आहेत. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात डेविड वॉर्नरने 70 धावा करत काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
2 / 6
वेस्ट इंडिजविरुद्ध डेविड वॉर्नरने 100 वा टी20 सामना खेळला. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला आहे. तसेच 100 टी20 सामने खेळणारा तिसरा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. एरोन फिंचने 103 टी20 सामने खेळले आहेत.
3 / 6
वॉर्नर आधी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये 100 हून अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूच्या यादीत विराट कोहली आणि न्यूझीलंडच्या रॉस टेलरचं नाव येतं. त्यानंतर आता ही किमया डेविड वॉर्नरने साधली आहे.
4 / 6
100 व्या टी20 सामन्यात डेविड वॉर्नरने 70 धावांची वादळी खेळ केली. तीन प्रकारच्या 100 व्या सामन्यात 50 हून अधिक धावा करणार पहिला फलंदाज ठरला आहे. 2017 मध्ये भारताविरुद्ध 100 वा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या वॉर्नरने 124 धावा केल्या होत्या. 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 100 वा कसोटी खेळताना 200 धावांची द्विशतकी खेळी खेळली.
5 / 6
वॉर्नरचे वेस्ट इंडिजविरुद्धचे अर्धशतक हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 37 वं अर्धशतक आहे. वॉर्नरने टी-20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतके पूर्ण केली आहेत. या फॉरमॅटमध्ये ही कामगिरी करणारा वॉर्नर आता पहिला खेळाडू ठरला आहे.
6 / 6
वॉर्नरनंतर टी20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. त्याच्या नावे 91 अर्धशतकं आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ख्रिस गेलने टी20 फॉरमॅटमध्ये 88 अर्धशतकं झळकावली आहेत.