AUS vs WI : सिक्युरिटी गार्डची नोकरी सोडून हाती घेतला चेंडू, पदार्पणाच्या कसोटीतच शमरचा ‘पंच’

| Updated on: Jan 19, 2024 | 8:35 PM

ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा 10 विकेट्सने पराभव केला. पण या सामन्यात वेस्ट इंडिजचा शमर जोसेफ चमकला.

1 / 6
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिला कसोटी सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून जिंकला. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 188 धावा केल्या. त्या बदल्यात ऑस्ट्रेलियाने 283 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडे 95 धावांची आघाडी होती. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज 120 धावांवर बाद झाला आणि 26 धावा विजयासाठी दिल्या. ऑस्ट्रेलियाने बिनबाद या धावा केल्या.

2 / 6
पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या शमर जोसेफने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कसोटी कारकिर्दिच्या पहिल्याच चेंडूवर स्टिव्ह स्मिथला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर एका पाठोपाठ एक निम्मा संघ तंबूत पाठवला.

3 / 6
वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफने स्टीव्ह स्मिथसह एकूण पाच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या कसोटी पदार्पणातच तंबूत पाठवलं. स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, मिचेल स्टार्क आणि नॅथन लियॉन यांना आपले बळी बनवले.

4 / 6
शमर हा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. जानेवारी 2023 मध्ये त्याने सुरक्षा रक्षकाची नोकरी सोडली होती आणि जानेवारी 2024 मध्ये वेस्ट इंडिज संघात आला. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने आपली झलक दाखवून दिली.

5 / 6
वेस्ट इंडिज संघात सहभागी होण्यापूर्वी शमरने फक्त पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. पाच प्रथम श्रेणी सामन्यांच्या 10 डावात गोलंदाजी करत त्याने 21.80 च्या सरासरीने 21 विकेट्स घेतल्या आणि वेस्ट इंडिज व्यवस्थापनाला दखल घेण्यास भाग पाडलं.

6 / 6
जोसेफ हा कसोटी इतिहासात पदार्पणाच्या सामन्यात पाच गडी बाद करणारा 14 वा खेळाडू ठरला. शमर पदार्पणातच पाच विकेट घेणारा पहिला वेस्ट इंडिजचा खेळाडू ठरला. त्यात पहिल्याच चेंडूवर स्टीव्ह स्मिथच्या विकेटचा समावेश आहे.