एडम गिलख्रिस्टने जगातील बेस्ट 3 विकेटकीपरची केली निवड, कोण आहेत ते जाणून घ्या
एडम गिलख्रिस्ट हा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज विकेटकीपर बॅट्समन आहे. एक काळ असा होता की गिलख्रिस्ट मैदानात उतरला की प्रतिस्पर्धी संघांच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडायचा. अशा या महान विकेटकीपर फलंदाजाने जगातील तीन सर्वोत्तम विकेटकीपरची नावं जाहीर केली आहेत.
1 / 5
ऑस्ट्रेलियाचा संघ विकेटकीपर एडम गिलख्रिस्टच्या नावाशिवाय अपूर्ण राहील. एडम गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलिया तीन वर्ल्डकप जिंकून दिले आहेत. यावरूनच विकेटकीपर फलंदाज असलेल्या एडम गिलख्रिस्टची महती कळते. आता गिलख्रिस्टने त्याच्या बेस्ट विकेटकीपरची यादी समोर आणली आहे.
2 / 5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एडम गिलख्रिस्टने विकेटच्या मागे 813 झेल पकडले आहेत. तर 92 स्टम्पिंग केल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सर्वोत्तम तीन विकेटकीपरची नावं जाहीर केली आहेत.
3 / 5
एडम गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाच्या रॉडनी मार्श याला गुरु मानतो. त्याच्यासारखं होण्याचं गिलख्रिस्टचं स्वप्न होतं. रॉडनी मार्श यांचा 1947 मध्ये जन्म झाला होता. 1970 मध्ये कसोटी पदार्पण केलं. तसेच 96 कसोटी सामन्यात 3633 धावा केल्या. यात 3 शतकांचा समावेश आहे. विकेटकीपर म्हणून 343 झेल आणि 12 स्टम्पिंग केले आहेत.
4 / 5
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि विकेटकीपर बॅट्समन म्हणून महेंद्रसिंह धोनीची जगभर ख्याती आहे. त्याच्या खेळीची एडम गिलख्रिस्ट यालाही भूरळ पडली आहे. धोनीने टीम इंडियासाठी 90 कसोटी सामने खेळले असून 4876 धावा केल्या आहेत. यात 6 शतकं आहेत. विकेटकीपर म्हणून 256 झेल आणि 38 स्टम्पिंग घेतल्या आहेत.
5 / 5
एडम गिलख्रिस्टच्या यादीत तिसरं नाव येतं ते श्रीलंकेच्या कुमार संगकाराचं..त्याने श्रीलंकेसाठी 134 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. एकूण 12400 धावा केल्या आहेत यात 38 शतकं आहेत. कसोटीत 182 झेलं आणि 20 स्टम्पिंग केल्या आहेत.