टीम इंडियाची वनडे वर्ल्ड कपआधी वाईट कामगिरी, ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वनडेत हारकिरी
टीम इंडियाने पहिला सामना जिंकल्याने दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची सुवर्णसंधी होती मात्र झालं उलटच. ऑस्ट्रेलियाने पलटवार करत टीम इंडियाचा पराभव केला. या पराभवासह टीम इंडियाच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
1 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्धची एकदिवसीय मालिका ही टीम इंडियासाठी आगामी वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या सामन्यात पराभव केला. मात्र कांगारुंनी दुसऱ्या सामन्यात जोरदार पलटवार करत टीम इंडियावर 10 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं.
2 / 6
टीम इंडिया अवघ्या 117 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाचा हा तिसरा निच्चांकी स्कोअर ठरला. याआधी टीम इंडियाने 1981 मध्ये सिडनीत 63 धावांवर ऑलआऊट झाली होती. टीम इंडियाचा हा सर्वात निच्चांकी स्कोअर ठरला होता.
3 / 6
तसेच टीम इंडियाने मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 148 धावा केल्या होत्या. हा टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा भारतातील निच्चांकी स्कोअर ठरला. इतकंच नाही, तर टीम इंडियाचा हा मायदेशातील चौथा लोएस्ट स्कोअर ठरला. टीम इंडियाचा भारतातील 78 ही सर्वात कमी धावसंख्या आहे. या धावा टीम इंडियाने श्रीलंका विरुद्ध 1986 साली कानपूरमध्ये केली होती.
4 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे चौघे शून्यावर आऊट झाले. यासह टीम इंडियाकडून सर्वाधिक वेळा शून्यावर आऊट होण्याचा हा खराब रेकॉर्ड आहे. याआधी एकूण 5 डावांमध्ये टीम इंडियाचे 4 फलंदाज शून्यावर आऊट झाले होते.
5 / 6
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क याने 5 विकेट्स घेत विजयात निर्णायक भूमिका बजावली. स्टार्क याने 8 ओव्हरमध्ये 53 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. यामध्ये त्याने 1 मेडन ओव्हर टाकली. स्टार्कने कॅप्टन रोहित शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि मोहम्मद सिराज या 5 जणांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
6 / 6
ऑस्ट्रेलियाने 118 धावांचं विजयी आव्हान अवघ्या 11 ओव्हरमध्ये पूर्ण केल. याचाच अर्थ ऑस्ट्रेलियाने 234 चेंडूआधी विजय मिळवला. टीम इंडियाचा पहिले बॅटिंग केल्यानंतर चेंडूच्या फरकांच्या हिशोबाने मोठा पराभव ठरला. याआधी न्यूझीलंडने टीम इंडियवर 2019 मध्ये 219 बॉलआधी विजय मिळवला होता.