AUS vs NZ : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिलाच संघ
World Cup 2023, AUS vs NZ :वनडे वर्ल्डकप स्पर्धेत सुरुवातीचे दोन सामने गमवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक केलं आहे. वनडे वर्ल्डकप इतिहासात ऑस्ट्रेलियाने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध 388 धावा करताच रेकॉर्ड झाला आहे.
1 / 6
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत 27 वा सामना न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत न्यूझीलंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 388 धावा केल्या आणि एका विक्रमाची नोंद केली.
2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या नावावर 350 हून अधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे. सलग तीन सामन्यात ऑस्ट्रेलियाने ही कामगिरी केली आहे. पाकिस्तान, नेदरलँड आणि न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली आहे.
3 / 6
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात 367 धावा, नेदरलँड विरुद्ध 399 धावा आणि न्यूझीलंड विरुद्ध 388 धावा केल्य आहेत. यापूर्वी कोणत्याही संघाने सलग तीन सामन्यात 350 हून अधिक धावा केल्या नव्हत्या.
4 / 6
ऑस्ट्रेलियाला 350 हून अधिक धावा करण्यासाठी ट्रेव्हिस हेड याचं शतक महत्त्वाचं ठरलं. डेविड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी जोरदार फटकेबाजी केली. तर शेवटी येत कर्णधार पॅट कमिंस आणि जोश इंग्लिस यांनीही आक्रमक खेळी केली.
5 / 6
न्यूझीलंड विरुद्धचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर उपांत्य फेरीचा वाट मोकळी होणार आहे. तर श्रीलंका, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघांचं कठीण होणार आहे. दुसरीकडे, बांगलादेश, इंग्लंड आणि नेदरलँडसाठी मोठ्या चमत्काराची अपेक्षा असेल.
6 / 6
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड