ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरने विक्रमासह कसोटी क्रिकेटला दिला निरोप, आतापर्यंत काय केलं ते जाणून घ्या
ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची कसोटी मालिका 3-0 ने जिंकली. डेविड वॉर्नरच्या कसोटी क्रिकेटला ही मालिका संपताच पूर्ण विराम लागला आहे. डेविड वॉर्नर ऑस्ट्रेलियासाठी 112 कसोटी सामने खेळला. त्यात 205 डाव खेळला. यात 3 द्विशतकं, 26 शतकं आणि 37 अर्धशतकं ठोकली.
1 / 6
पाकिस्तान विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 8 गडी राखून जिंकला. ही कसोटी मालिका डेविड वॉर्नरच्या कारकिर्दितील शेवटची मालिका होती. शेवटच्या डावात डेविड वॉर्नरने 57 धावा केल्या. तसेच सामना संपताच कसोटी क्रिकेट कारकिर्दिला पूर्णविराम लागला आहे.
2 / 6
अर्धशतकासह ऑस्ट्रेलियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सलामीवीर होण्याचा विक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम मॅथ्यू हेडनच्या नावावर होता.
3 / 6
ऑस्ट्रेलियाच्या माजी डावखुरा सलामीवर मॅथ्यू हेडन याने सलामीवर म्हणून 8625 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम डेविड वॉर्नरने मोडीत काढला आहे.
4 / 6
ऑस्ट्रेलियाकडून 205 डाव खेळणाऱ्या डेविड वॉर्नरने सलामीला येत 8776 धावा केल्या आहेत. यासह डेविड वॉर्नरने सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे.
5 / 6
त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी 463 डाव खेळले आणि 18612 धावा केल्या आहेत.
6 / 6
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग या यादीत अव्वल स्थानी आहे. त्याने 667 डाव खेळणाऱ्या पॉटिंगने 27368 धावा केल्या आहेत आणि विक्रम केला आहे.