क्रिकेट इतिहासात भारतानंतर ऑस्ट्रेलियाला मिळाला असा मान, अशी कामगिरी करणारा दुसरा संघ

| Updated on: Feb 06, 2024 | 4:48 PM

ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर होता. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे सामना खेळताच हा विक्रम करणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ ठरला आहे. तर या यादीत पाकिस्तान तिसऱ्या स्थानावर आहे.

1 / 6
ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा वनडे सामना कॅनबेरा येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 8 गडी राखून जिंकला. विजयासाठी फक्त 86 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 6.5 षटकात पूर्ण केलं.

2 / 6
वनडे क्रिकेट कारकिर्दितील ऑस्ट्रेलियाचा हा 1000 वा सामना होता. यापूर्वी अशी कामगिरी भारतीय संघाने केली आहे. त्यामुळे 1000 सामने खेळणारा ऑस्ट्रेलिया हा दुसरा संघ आहे.

3 / 6
2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत भारताने 1000 सामन्यांचा पल्ला गाठला होता. अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला संघ ठरला. आता ऑस्ट्रेलिया दुसरा संघ ठरला आहे.

4 / 6
एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत (1055 सामने) आणि ऑस्ट्रेलिया (1000 सामने) वगळता इतर कोणत्याही संघाने 1000 सामने खेळलेले नाहीत.

5 / 6
पाकिस्तानचा संघ या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान संघाने आतापर्यंत 970 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तसेच चौथ्या स्थानावर श्रीलंकन संघ असून आतापर्यंत 912 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

6 / 6
ऑस्ट्रेलियन संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध 1000 वा सामना जिंकला. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाने 24.1 षटकांत सर्वबाद 86 धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाने 87 धावांचे सोपे लक्ष्य 6.5 षटकात पूर्ण केले आणि 8 विकेट्स राखून विजय मिळवला.