कसोटी क्रिकेट इतिहासात तीन फलंदाजांनी सक्षमपणे केला बुमराहचा सामना, कोण ते जाणून घ्या

| Updated on: Dec 26, 2024 | 4:13 PM

जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमधील नंबर एक गोलंदाज आहे. नुकत्याच आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यामुळे भल्याभल्या खेळाडूंना त्याच्या गोलंदाजी भीती वाटते. पण तरुण सॅम कोनस्टासने त्याचा प्रभावी मारा परतावून लागला हे विशेष..

1 / 5
जसप्रीत बुमराह हे भारताच्या गोलंदाजीतील प्रमुख अस्त्र आहे. त्याचा सामना करणं भल्याभल्यांना जमत नाही. चुकून चौकार षटकार मारण्याची हिम्मत होते. शक्यतो फलंदाज त्याला बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न करतात. कारण त्याचा सामना मोकळेपणाने करणं खरंच खूप कठीण आहे. अशा स्थितीत पहिल्या कसोटीत सॅम कोनस्टासने बुमराहचा मारा परतवून लावण्यात यश मिळवलं आहे. बुमराहच्या स्पेलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

2 / 5
पहिल्या कसोटीत सॅम कोनस्टासने बुमराहचा मारा परतवून लावण्यात यश मिळवलं आहे. बुमराहच्या स्पेलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्या पहिल्याच सामन्यात 60 धावा ठोकत आपली छाप सोडली आहे.

3 / 5
सॅम कॉनस्टासने चौथ्या कसोटी सामन्यात भारताविरुद्ध पदार्पण केलं आहे. पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतकी खेळी करत आपली छाप सोडली आहे. इतकंच काय बुमराहने टाकलेल्या पहिल्या स्पेलमधील 34 चेंडूचा प्रभावी सामना करत 33 धावा ठोकल्या. एका षटकात 14, तर दुसऱ्या षटकात 18 धावा ठोकल्या आहेत.

4 / 5
इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कूकचाही बुमराहच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा इतिहास आहे. 2018 मध्ये ओव्हलमध्ये जसप्रीत बुमराहच्या पहिल्या स्पेलमध्ये कुकने 40 चेंडूत 25 धावा केल्या होत्या.

5 / 5
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डुप्लेसिस या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. 2018 मध्ये केपटाऊन येथे झालेल्या कसोटी सामन्यात बुमराहने टाकलेल्या एका स्पेलमध्ये फाफने 18 चेंडूत 23 धावा केल्या होत्या.