IND vs AUS 3rd ODI : स्टीव्ह स्मिथ याने गाठला आणखी मैलाचा दगड, 20 धावा करताच वॉर्नर आणि फिंचच्या यादीत समावेश
IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. वनडे क्रिकेट कारकिर्दित त्याने एका विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलियाचा 17 वा फलंदाज ठरला आहे.
1 / 6
ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 गडी गमवून 352 धावा केल्या. तसेच विजयसाठी 353 धावांचं आव्हान दिलं आहे.
2 / 6
स्टीव्ह स्मिथ याने 61 चेंडूत 74 धावांची खेळी केली. यात 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. या सामन्यात त्याने एक विक्रमाची नोंद केली आहे.
3 / 6
स्टीव्ह स्मिथने फक्त 20 धावा करताच 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथने 2010 मध्ये वनडे क्रिकेट कारकिर्दिला सुरुवात केली होती. आतापर्यंत स्टीव्ह स्मिथ 145 वनडे सामने खेळला आहे.
4 / 6
स्टीव्ह स्मिथ याने 44.38 च्या सरासरीने 5015 धावा केल्या आहेत. यात स्मिथने 12 शतकं आणि 30 अर्धशतकं झळकावली आहेत. यात 164 हा त्याचा सर्वोत्तम स्कोअर आहे.
5 / 6
स्टीव्ह स्मिथ 5 हजार धावा पूर्ण करणारा 17 वा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे. फास्टेट 5 हजार धावा पूर्ण करणारा चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे.
6 / 6
स्टीव्ह स्मिथ याने 129 डावात 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानावर असलेल्या डीन जोंस याने 128 डावात 5 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर अव्वल स्थानी असलेल्या डेविड वॉर्नर याने 115 डावात ही किमया साधली होती.