IPL 2024 : ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क 9 वर्षानंतर आयपीएलमध्ये खेळणार! काय म्हणाला ते जाणून घ्या
IPL 2024 : कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने आयपीएलमधून माघार घेतली होती. आता 9 पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
1 / 7
ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कसोटी क्रिकेटसाठी त्याने आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला होता. आता 9 वर्षानंतर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
2 / 7
आयपीएल 2024 स्पर्धेत खेळण्याचं एक खास कारण आहे. कारण पुढच्या वर्षी आयपीएल स्पर्धा पार पडली की वेस्ट इंडिज आणि यूएसमध्ये टी20 विश्वचषक असणार आहे. त्यासाठी तयारी करण्यासाठी आयपीएलमध्ये खेळण्याची त्याची इच्छा असल्याचं बोललं जात आहे.
3 / 7
आयपीएलमध्ये मिचेल स्टार्क विराट कोहली याच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या संघाकडून 2015 साली खेळला होता. त्यानंतर कसोटीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आयपीएलमधून माघार घेतली होती.
4 / 7
डावखुरा वेगवान गोलंदाज आतापर्यंत 27 आयपीएल सामन्यात खेळला. त्याने 7.17 च्या इकॉनॉमीच्या रेटने 34 गडी बाद केले. 15 धावा देत 4 गडी बाद करणं हा त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
5 / 7
आयपीएल 2014 मध्ये 14 आणि 2015 मध्ये 13 सामन्यात आरसीबीकडून खेळला. 2018 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली.
6 / 7
पुढच्या वर्षी टी20 विश्वचषक होणार असल्याने आयपीएल तयारी करण्याची नामी संधी आहे. त्यामुळे मिचेल स्टार्क याने आयपीएलमध्ये खेळण्याची तयारी दर्शवली असल्याचं बोललं जात आहे.
7 / 7
मिचेल स्टार्क याने सांगितलं की, "बघा आठ वर्षे झाली असून मी निश्चितपणे पुढच्या आयपीएलमध्ये परतेन. त्यामुळे टी20 विश्वचषकासाठी चांगली तयारी करता येईल."