टीम इंडिया आशिया कप 2023 मध्ये आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. त्या सामन्याआधी टीम इंडियाच्या विराट कोहली याच्यासाठी वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम याने विराट कोहली याच्यासह अनेकांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
बाबर आझम याने नेपाळ विरुद्ध 151 धावांची खेळी केली. बाबर आझम याच्या वनडे कारकीर्दीतील 19 वं शतक ठरलं. बाबरने सर्वात कमी 102 डावात वेगवान 19 वनडे शतकं ठोकण्याची कामगिरी केली. बाबरने यासह एका झटक्यात अनेक दिग्गजांना मागे टाकलं.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटर हाशिल अमला याने 104 डावात 19 एकदिवसीय शतकं पूर्ण केली होती. बाबरने आमलाच्या 2 डावांआधी ही कामगिरी केली.
विराट कोहली याने फक्त 124 डावांमध्ये 19 वनडे सेंच्युरी ठोकल्या होत्या. विराटच्या नावावर आता वनडेत 49 शतकांची नोंद आहे.
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 139 डावांमध्ये 19 शतकांचा टप्पा गाठला होता. वॉर्नरने त्याच्या कारकीर्दीत 6 हजार 30 धावा केल्या आहेत.
तर दक्षिण आफ्रिकेचा माजी मिस्टर 360 असलेला एबीडी व्हीलियर्स याने 171 डावांमध्ये 19 शतकं पूर्ण केली होती. बाबरने नेपाळ विरुद्ध शतक ठोकत आशिया कपमध्ये दमदार सुरुवात केली आणि वेगवान 19 शतकं पूर्ण करण्याता वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केला.