BAN vs NZ : बांगलादेशच्या महमुदुल्लाह याला मिळालं दुर्मिळ यादीत स्थान, वनडेत अशी कामगिरी करणारा चौथा खेळाडू

| Updated on: Sep 26, 2023 | 9:44 PM

BAN vs NZ : न्यूझीलंडने बांगलादेश विरुद्धची तीन सामन्यांची मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. तिसऱ्या निर्णायक सामन्यात बांगलादेशला 7 गडी राखून पराभूत केलं. पण दुसरीकडे महमुदुल्लाच्या नावावर एक विक्रम नोंदवला गेला आहे.

1 / 6
न्यूझीलंडने बांगलादेश विरुद्धची मालिका 2-0 ने जिंकली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर सलग दोन सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. बांगलादेशने तिसऱ्या सामन्यात सर्वबाद 171 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान न्यूझीलंडने 3 गडी गमवून पूर्ण केलं.

2 / 6
बांगलादेश क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज महमुदुल्लाह याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात 21 धावा केल्या आणि 5000 धावा पूर्ण केल्या आहेत.

3 / 6
बांगलादेशकडून 5000 धावा पूर्ण करणारा महमुदुल्लाह हा चौथा फलंदाज ठरला आहे. महमुदुल्ला आता तमीम इक्बाल, मुशफिकुर रहीम आणि शकीब अल हसन यांच्या यादीत सामील झाला आहे.

4 / 6
तमिमने 243 एकदिवसीय सामन्यांमध्ये 36.65 च्या सरासरीने 8,357 धावा केल्या आहेत. बांगलादेशकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रहीमने 256 सामन्यात 37.03 च्या सरासरीने 7,406 धावा केल्या आहेत. शाकिबने 37.67 च्या सरासरीने 7,384 धावा केल्या आहेत.

5 / 6
महमुदुल्लाहने 2007 मध्ये श्रीलंका विरुद्धच्या सामन्यातून एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने आतापर्यंत 221 एकदिवसीय सामन्यांच्या 192 डावांमध्ये 35.35 च्या सरासरीने 5,020 धावा केल्या आहेत.

6 / 6
महमुदुल्लाहने आपल्या आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट कारकिर्दीत 3 शतके आणि 27 अर्धशतके केली आहेत.वनडेत त्याची नाबाद 128 धावा ही सर्वोत्तम खेळी आहे.