टी20 वर्ल्डकप तोंडावर असताना दिग्गज खेळाडूचं करिअर धोक्यात! डोळ्याच्या गंभीर आजाराचा खुलासा

| Updated on: Jan 25, 2024 | 6:23 PM

आयपीएल आणि टी20 वर्ल्डकप स्पर्धा तोंडावर असताना क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे. टी20 क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत असलेल्या दिग्गज खेळाडूला डोळ्याचा गंभीर आजार असल्याचं समोर आलं. त्याला कायमचं अंधत्व येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

1 / 6
टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यासाठी सर्वच संघांची आणि खेळाडूंची तयारी सुरु झाली आहे. पण दिग्गज खेळाडूला डोळ्याच्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागतं आहे. कायमचं अंधत्व येण्याची शक्यता आहे.

2 / 6
बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार शकिब अल हसनला डोळ्यातील गंभीर आजाराला सामोरं जावं लागत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याबाबतची माहिती शेअर केली आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात एकच खळबळ उडाली आहे.

3 / 6
शाकिब 2023 वनडे वर्ल्डकपमध्ये खेळला होता. मात्र या स्पर्धेत त्याला डाव्या डोळ्याच्या रेटिनामध्ये समस्या असल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्याला पाहण्यात अडचण येत आहे. त्यानंतर नेत्रतज्ज्ञांना तपासल्यानंतर त्याच्या रेटिनामध्ये समस्या असल्याचे समोर आले आहे.

4 / 6
बीसीबीचे वरिष्ठ डॉक्टर देबाशीष चौधरी म्हणाले की, शाकिबला डाव्या डोळ्याला त्रास आहे. तो एक्स्ट्राफोव्हल सेंट्रल सेरस कोरिओरेटिनोपॅथी (CSR) या आजाराने त्रस्त आहे. दुसरीकडे, या  आजारामुळे दृष्टी गमवण्याची वेळही येऊ शकते.

5 / 6
शाकिबवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकाने त्याला सर्वोत्तम उपचार देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच शाकिब पुढील उपचारासाठी सिंगापूरला जाण्याची शक्यता आहे.

6 / 6
बांगलादेशचा कर्णधार शकीब अल हसन डोळ्याच्या समस्येने त्रस्त असल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण काही महिन्यांवर टी20 वर्ल्डकप आहे. शाकिब खेळणार की नाही याबाबत अजूनतरी काही निश्चित नाही.