बांगलादेश क्रिकेट टीमचा कर्णधार तमिम इक्बाल याने 24 तासात निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. पंतप्रधान शेख हसिना यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर तमीमने हा निर्णय घेतला. मात्र निवृत्तीनंतर पुन्हा निर्णय मागे घेणारा तमिम हा एकटाच नाही. तर याआधी एकूण 4 कर्णधारांनी निवृत्ती जाहीर करुन निर्णय बदललाय. आश्चर्यकारक बाब म्हणजे या चौघांमध्ये एका माजी पंतप्रधानाचा समावेश आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने 2006 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटला रामराम ठोकला. मात्र त्याने निर्णय मागे घेतला. त्यानंतर 2010 मध्ये निवृत्ती जाहीर केली, पण पीसीबीच्या विनंतीनंतर खेळत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र आफ्रिदीने 2017 मध्ये तिसऱ्यांदा आणि अखेरीस आफ्रिदी निवृत्त झाला.
पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कर्णधार इमरान खान हा सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक. इमरान खान याने 1992 मध्ये आपल्या नेतृत्वात पाकिस्तानला वर्ल्ड चॅम्पियन केलं. इमरानने क्रिकेट विश्वाला अलविदा केलं होतं. मात्र पुन्हात तो परतला. इमरान खान हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधानही आहेत.
विंडिजचे माजी कर्णधार कार्ल हूपर यांनी 2002 मध्ये क्रिकेटला रामराम ठोकला. मात्र निर्णय बदलत 2003 वर्ल्ड कपमध्ये ते सहभागी झाले.
पाकिस्तान दिग्गज जावेद मियादाद एकूण 6 वनडे वर्ल्ड कप खेळले आहेत. मियादाद यांचा 1996 हा खेळाडू म्हणून अखेरचा वर्ल्ड कप होता. त्याआधी मियादाद यांनीही क्रिकेटमधून मुक्त होण्याचा निर्णय घेतला. पण नियतीला ते मान्य नव्हतं. मग काय, घेतला निर्णय मागे.