Rohit Shrama | रोहितची पोस्ट आणि बीसीसीआय एक्शन मोडमध्ये, चाहते मात्र निराश
India vs Sri Lanka Icc World Cup 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत टीम इंडिया आणि श्रीलंका आमनेसामने आहेत. श्रीलंका आणि टीम इंडिया यो दोन्ही संघांचा हा वर्ल्ड कपमधील सातवा सामना आहे.
1 / 5
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात आपल्या सातव्या विजयासाठी सज्ज आहे.
2 / 5
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने मुंबईतील खराब हवा आणि प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली. रोहितने सोशल मीडिया पोस्ट करत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर बीसीसीआय एक्शन मोडमध्ये आली आहे.
3 / 5
टीम इंडिया-श्रीलंका सामन्यादरम्यान फटाके फोडण्यास बंदी आहे. हवेचा दर्जा आणखी घसरुन नये यासाठी हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ही घोषणा केली आहे.
4 / 5
बीसीसीआयच्या निर्णयामुळे आता सामन्याच्या निकालानंतर फटाके फोडून जल्लोष करता येणार नाही. रोहितने इंस्टाग्रामवर पोस्ट करत मुंबईच्या हवामानाबाबत भाष्य केलं होतं.
5 / 5
बीसीसीआय सचिव जय शाह मुंबईतील घसरत्या हवेच्या दर्जाबाबत गंभीर आहेत. ते याबाबत आयसीसीसोबत चर्चा करणार आहेत.