Asia Cup 2023 : बीसीसीआय अध्यक्षांसहीत चार अधिकारी पाकिस्तानात, या मुद्द्यांवर होणार चर्चा
भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआयचे अधिकारी 17 वर्षानंतर पहिल्यांदा पाकिस्तान गेले आहेत. बीसीसीआय अध्यक्ष रोजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला आशिया कप 2023 सामन्यासाठी लाहोरला गेले आहेत. 2006 बीसीसीईय अधिकारी शेवटचं पाकिस्तानात गेले होते.
1 / 6
टीम इंडिया 2008 मध्ये शेवटचं पाकिस्तानात गेले होते. बीसीसीआयचे अधिकारी पाकिस्तानात गेल्याने दोन्ही देशांमध्ये क्रिकेट मालिका होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. आशिया कप 2023 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण सर्वाधिक सामने हे श्रीलंकेत होणार आहेत.
2 / 6
आशिया कप स्पर्धेचे चार सामने फक्त पाकिस्तानात होणार आहेत. त्यापैकी दोन सामने झाले आहेत. आता फक्त पाकिस्तानात दोन सामने खेळले जाणार आहेत. बीसीसीआयचे अधिकारी लाहोरमध्ये होणारा श्रीलंका अफगाणिस्तान सामना पाहणार आहेत. हा सामना 5 सप्टेंबरला होणार आहे.
3 / 6
पाकिस्तानी मीडियानुसार, बीसीसीआय अधिकारी आशिया कप आणि वनडे वर्ल्डकप बाबत चर्चा करणार आहेत. वर्ल्डकप ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे.
4 / 6
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, राजीव शुक्ला आणि बीसीसीआयचे इतर अधिकारी पीसीबीने आयोजित केलेल्या डिनर पार्टीत सहभागी झाले.
5 / 6
बीसीसीआय अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं की, "हा दोन दिवसांचा दौरा पूर्णपणे क्रिकेटशी निगडीत आहे. हा दौरा राजकीय दौरा नाही."
6 / 6
दुसरीकडे, श्रीलंकेतील हवामान पाहता इतर सामन्यांचं आयोजन पाकिस्तान केलं जाण्याची शक्यता आहे. याबाबतही या दौऱ्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. पण भारताकडून या निर्णयाला हिरवा कंदील मिळेल अशी स्थिती नाही.