Virat Kohli : विराट कोहली याच्या ‘त्या’ कृतीने बीसीसीआयचा संताप, आता सर्वच खेळाडूंना दिले असे आदेश
विराट कोहली याची नुकतीच यो-यो टेस्ट करण्यात आली. या टेस्टमध्ये विराट पास झाला असून त्याने त्याचा स्कोअर सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे बीसीसीआयने संताप व्यक्त केला आहे. तसेच विराट कोहली याला समज दिली आहे.
1 / 8
आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाचा बंगळुरू एनसीएमध्ये सराव सुरु आहे. या स्पर्धेसाठी दीर्घ काळापासून संघाबाहेर असलेल्या खेळाडूंची यो-यो ही फिटनेस चाचणी घेण्यात आली. 24 ऑगस्टला विराट कोहली याची चाचणी झाली.
2 / 8
विराट कोहली याने यो-यो टेस्टमध्ये मिळालेले गुण सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. विराटच्या या कृतीमुळे बीसीसीआयचा पारा चढला आहे. या प्रकरणी त्यांनी विराट कोहली याला समज दिली आहे.
3 / 8
विराट कोहलीने यो-यो टेस्टमध्ये पास झाल्याचं सांगत मिळालेले शेअर केले. विराट कोहली याला एकूण 17.2 गुण मिळाले आहेत. यामुळे या चाचणीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
4 / 8
विराट कोहली याने यो-यो टेस्टची माहिती सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर टीम इंडिया व्यवस्थापन खडबडून जागं झालं आहे. फिटनेस स्कोअर ही गोपनीय बाब असून सोशल मीडियावर शेअर करू नये असं सांगण्यात आलं आहे.
5 / 8
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने शिबिरात सहभागी असलेल्या सर्व खेळाडूंना याबाबत ताकीद दिली आहे. अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून खडे बोल सुनावले आहेत.
6 / 8
खेळाडू हवं असल्यास ट्रॅकवर धावतानाचे फोटो पोस्ट करू शकतात. पण यो-यो टेस्टचे गुण सोशल मीडियावर शेअर करणं कराराच्या अटींचं उल्लंघन असेल, असं सांगितलं आहे.
7 / 8
बीसीसीआयने आशिया कप खेळणाऱ्या खेळाडूंसाठी 6 दिवसांच्या शिबीर आयोजित केलं आहे. यात पहिल्या दिवशी खेळाडूंची यो-यो चाचणी घेण्यात आली. प्रशिक्षक खेळाडूंचा फिटनेस तपासत असून निकष पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
8 / 8
वेस्ट इंडिज दौऱ्यावरून परतलेल्या आणि आयर्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेचा भाग नसलेल्या खेळाडूंसाठी व्यवस्थापनाने 13 दिवसांचा फिटनेस कार्यक्रम हाती घेतला आहे. यात रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे.