IND Vs SA | टीम इंडियाच्या निवडीनंतर चित्र स्पष्ट, या 6 जणांच्या करिअरला ब्रेक
India Tour Of South Africa | भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात 6 अनुभवी खेळाडूंना निवड समितीने संधी दिलेली नाही.
1 / 7
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. बीसीसीआयने 6 खेळाडूंची कसोटी मालिकेसाठी निवड केली नाही. त्यामुळे त्या 6 खेळाडूंच्या टेस्ट करिअरला ब्रेक लागल्याचं म्हटलं जात आहे. ते कोण आहेत, आपण जाणून घेऊयात.
2 / 7
बीसीसीआयने अजिंक्य रहाणे याला संधी दिलेली नाही. रहाणेच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावेलला नाही. याच रहाणेने टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये लाज राखली होती.
3 / 7
चेतेश्वर पुजारा राहुल द्रविड याचा क्रिकेटमधील वारसदार आहे. पुजाराने अनेकदा टीम इंडियासाठी तारणहार आणि संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. मात्र निवड समितीने पुजाराचा विचार केला नाही.
4 / 7
इशांत शर्मा अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. मात्र ईशांतला 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी स्थान मिळवण्यात अपयश आलं आहे.
5 / 7
भुवनेश्वर कुमार गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. भुवी बॉल दोन्ही बाजूने फिरवण्यात माहीर आहे. त्यालाही संधी देण्यात आली नाही.
6 / 7
नागपूरचा उमेश यादव यालाही निवड समितीने डच्चू दिला आहे. उमेशला जेव्हा जेव्हा संधी मिळाली, त्याला फारशी अशी छाप सोडता आली नाही.
7 / 7
जयदेव उनाडकट याची 10 वर्षांनंतर टीम इंडियात निवड करण्यात आली. जयदेव बॉर्डर गावसकर ट्रॉफी, डब्ल्यूटीसी फायनल आणि त्यानंतर विंडिज दौऱ्यातही खेळला. मात्र त्याला बॉलिंगने जादू करता आली नाही.