बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी शनिवारी 18 जानेवारीला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर शुबमन गिल याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा आहे. मात्र टीम इंडियात 4 खेळाडूंना संधी न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (Photo Credit : Bcci)
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन हा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्रबळ दावेदार होता. संजूने त्याच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केलं होतं. मात्र निवड समितीने संजूला डच्चू दिला आणि दुसरा विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतची निवड केली. (Photo Credit : Pti)
टीम इंडियाचा टी 20i संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याचाही समावेश करण्यात आला नाही. सूर्याला संधी मिळेल, असं म्हटलं जात होतं. मात्र सूर्याचा समावेश करण्यात आलेला नाही. (Photo Credit : Pti)
करुण नायर याचं विजय हजारे ट्रॉफीतील अप्रतिम कामगिरीनंतर कमबॅक होईल, असा अंदाज होता. करुणने 7 सामन्यांमध्ये एकूण 5 शतकांसह 750 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. मात्र या धावा निवड समितीला प्रभावित करु शकल्या नाहीत. (Photo Credit :Mark Kolbe - CA/Cricket Australia via Getty Images/Getty Imag)
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यालाही वगळण्यात आलं आहे. तर दुसऱ्या बाजूला वनडे वर्ल्ड कप 2023 फायनलनंतर मोहम्मद शमीचं एकदिवसीय संघात पुनरागमन झालं आहे. (Photo Credit : Pti)
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार) , विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा. (Photo Credit : K L Rahul X Account)