भारत इंग्लंड तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी राजकोट स्टेडियमचं नाव बदलणार, का आणि काय ते जाणून घ्या
भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे होणार आहे. तत्पूर्वी या स्टेडियमचं नाव बदलण्यात येणार आहे.
1 / 7
भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून राजकोट येथे होणार आहे. तत्पूर्वी या स्टेडियमचं नाव बदलण्यात येणार आहे.
2 / 7
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. हा सामना राजकोटमध्ये असेल पण त्या स्टेडियमचं नाव बदलेलं असेल. यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
3 / 7
राजकोट क्रिकेट स्टेडियमला तसं अधिकृत असं काही नाव नाही. राज्य क्रिकेट संघटनेचे म्हणजे सौराष्ट्र क्रिकेट असोशिएशनचं स्टेडियम म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे नवं नाव काय असेल याची उत्सुकता आहे.
4 / 7
राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमला प्रसिद्ध क्रिकेट प्रशासक निरंजन शाह यांचे नाव देण्यात येणार आहे. भारत-इंग्लंड तिसरी कसोटी सुरू होण्याच्या एक दिवस आधी क्रिकेट स्टेडियमला नाव देण्यात येणार आहे.
5 / 7
क्रिकेट प्रशासक होण्यापूर्वी निरंजन शाह स्वतः क्रिकेटपटू होते. 1965 ते 1975 दरम्यान तो सौराष्ट्रकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहेत. सध्या निरंजन शहा हे सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत.
6 / 7
भारताने राजकोटमध्ये आतापर्यंत 2 कसोटी सामने खेळले आहेत. यात एका सामन्यात विजय तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला होता.
7 / 7
कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये झाला आणि भारताने गमवला. विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने कमबॅक केलं. तिसरा कसोटी सामना राजकोटमध्ये, चौथा कसोटी सामना रांचीमध्ये तर पाचवा कसोटी सामना धर्मशाळा येथे खेळवली जाईल.