टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून मालिकेत 3-0 ने आघाडी घेण्याच्या प्रयत्नात आहे. या सामन्यात कॅप्टन रोहित शर्मा याला मोठा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.
रोहित शर्मा याला इंदूरमध्ये अनोख तिसरं शतक लगावण्याची संधी आहे. रोहितला अशी कामगिरी करत महापराक्रम करण्याची नामी संधी आहे.
rohit sharma with shubman gill
रोहितने इंदरूमध्ये श्रीलंका विरुद्ध टी 20 सामन्यात 118 धावांनी वादळी खेळी केली होती. तर न्यूझीलंड विरुद्ध 101 धावांची शतकी खेळी केली.
रोहितचा इंदूरमधील हा तिसरा कसोटी सामना आहे. याआधीच्या 2 सामन्यात रोहितने 57 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्यामुळे रोहित कांगारुंविरुद्ध शतक ठोकत रेकॉर्ड करणार का, याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.